महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लागू केलेल्या वेतन आयोगाच्या शिफारसी नुसार निर्गमित झालेल्या अधिसुचानांप्रमाणे विविध विभाग प्रमुख यांनी त्यांच्या अधिनिस्थ अधिकारी /कर्मचारी यांच्या केलेल्या वेतन निश्चितीची पडताळणी करण्याकरिता सन १९६४ पासून विभागनिहाय वेतन पडताळणी पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे.सद्यस्थितीत एकूण ७ वेतन पडताळणी पथके कार्यरत असून प्रत्येक विभागात सेवापुस्तक पडताळणीचे ध्येय खालील प्रमाणे आहे.
वेतन पडताळणी पथक
| मुंबई
| कोंकण भवन
| पुणे
| नागपूर
| औरंगाबाद
| नाशिक
| अमरावती
| एकूण
|
सेवापुस्तक पडताळणीचे ध्येय
| ९०९१७
| ६४१४७
| १०६७४३
| ८५१५३
| ८४१३२
| ७२१८३
| ५७१६९
| ५६०४४४
|
वेतन पडताळणीचे काम जास्तीत जास्त पारदर्शी होण्याच्या दृष्टीकोनातून वेतन नियमन हे software बनविण्यात आले आहे.यामुळे सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकाकडे प्राप्त झाल्यानंतर सदर सेवापुस्ताकाची साद्यास्ठीतीबाबतची माहिती संबंधित आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी यांना समजणार आहे.सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकास प्राप्त झाल्याचा दिनांक,सेवापुस्तक प्रलंबित /प्रमाणीक/आक्षेप याची माहिती मिळेल .सेवापुस्ताकास आक्षेप असल्यास त्या आक्षेपास अनुसरून महत्वाचे अभिलेखांची किंवा सेवापुस्ताकातील नोंदींची पूर्तता संबंधित कार्यालयास करणे सुलभ होईल व वेतन पडताळणीचे कामही जलद गतीने होण्यास मदत होईल.
For 7th pay verification click here:- 7th Pay Verification
|